शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील पाच जकात नाक्यांवर ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बस, खासगी बस या ठिकाणाहून सोडण्यात येणार आहे.
शहरातील वाहतुकीच्या संदर्भात महापालिकेत पालिका आयुक्त महेश पाठक, वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अरूण येवला यांची सोमवारी बैठक झाली, त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. शहरात दररोज एसटी बसच्या पाच हजाराहून अधिक फेऱ्या होतात. त्यामुळे एसटीची वर्दळ सुरू असते. त्याचबरोबर शहरात खासगी बसेसची संख्या वाढलेली आहे. या बसेसना शहराबाहेरच थांबा मिळाल्यास वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील रिकामे झालेले जकातनाके यासाठी वापरण्यास पालिकेने मान्यता दिली. त्यानुसार हडपसर, शेवाळेवाडी, वाघोली, औंध, शिंदेवाडी, फुगेवाडी, बालेवाडी जकातनाक्यांवर खासगी व एसटी महामंडळाच्या बसचा थांबा करण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी प्रिपेड रिक्षा, वाहतूक चौकीही उभारली जाणार आहे. तसेच प्रवाशांसाठी रेस्टरुम व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा