पिंपरी : भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे. मैनुद्दीन अब्दुल सत्तार (वय २३) आणि बिपलभ बिधन राणा (वय २४, दोघे रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : मराठा आरक्षणासाठी नवले पूल परिसरात आंदोलन; टायर जाळले, वाहतूक ठप्प

हेही वाचा – पुणे : ललित पाटील पलायनानंतर ससूनमध्ये उरला केवळ एक कैदी रुग्ण

अवैध धंद्याची माहिती घेत हिंजवडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. आरोपी टेम्पोतून गांजी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाकड येथे टेम्पो अडविला. आरोपींकडे थांबवून चौकशी केली असता भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. टेम्पोतील पिशव्यांची झडती घेतली. त्यात ब्राऊन रंगाचे १७ पुडे आढळले. त्यामध्ये ३१ किलो १०० ग्रॅम गांजा मिळून आला. गांजा आणि टेम्पोसह १४ लाख ३८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transportation of ganja under the guise of vegetable waste 31 kg ganja seized in hinjewadi pune print news ggy 03 ssb
Show comments