हडपसरमधील मगरपट्टा परिसरात एका मोटारीवर (कारवर) तसेच रिक्षावर झाड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मगरपट्टा परिसरात एका सोसायटीच्या परिसरात मोटार तसेच शेजारी लावलेल्या रिक्षावर झाड कोसळण्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटार तसेच रिक्षाची पाहणी जवानांकडून करण्यात आली. मोटार आणि रिक्षात कोणी अडकले नसल्याची खात्री पटल्यानंतर जवानांनी कटरच्या सहाय्याने मोटार आणि रिक्षावर पडलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या. त्यानंतर क्रेनच्या मोटार आणि रिक्षा तेथून हलविण्यात आली. या घटनेत मोटार आणि रिक्षाचे नुकसान झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree fall on car in pune magarpatta pune print news scsg