वसंताचे सृजनशील गंधित वारे आपल्याला पहाटे हलकेच जागवत आहेत. पक्षी सृजनशीलतेमध्ये गढले आहेत अन् झाडे पानं गाळत आहेत. आपण आवार रोज झाडून स्वच्छ करतोय, पोत्यात पाला भरून ठेवतोय, कोपऱ्यात पालापाचोळ्याचा ढीग वाढत चालला आहे. काय करायचं या पाल्यापाचोळ्याचं? समर्थ रामदासांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दासबोधात लिहून ठेवलंय,
पृथ्वीपासूनी वेल होती नाना जिनस फाफावती
वाळोन कुडोन मागुती पृथ्वीचं होय
नाना धान्यांची नाना अन्ने मनुष्ये करिते भोजने
नाना विष्ठा नाना वमने पृथ्वीच होय
नाना तृणे पदार्थ पुजती पुढे त्याची होय माती
नाना किडे मरोन जाती पुढे पृथ्वी
झाडेपाले आणि तृण पशुभक्षिता होते सेण
खात मुत भस्म मिळोन पुन्हा पृथ्वी
उत्पत्ती स्थिती संहारते ते ते पृथ्वीस मिळोन जाते
जितुके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी
(दशक १४, समास ३)
निसर्गनिर्मित जे आहे त्याची माती होणार हे ठरलेलं आहे. आपण करत असलेल्या कचऱ्याची माती होण्यासाठी निसर्गाला मदत करायची. जैवविघटनशील गोष्टींचे विघटन होताना त्याच्यात साठलेली पोषक द्रव्ये मातीत मिसळतात. हे काम लाखो सुक्ष्म जीव, बुरशी, कीटक, जीवाणू, गांडुळे करतात.
जंगलामध्ये वर्षांनुवष्रे पालापाचोळा पडून त्याचे सेंद्रिय घटकात रूपांतर होते. त्याला ह्युमस म्हणतात. या ह्युमसमुळे जमिनीचा पोत सुधारतो. ती सजीव राहाते. शहरी जीवनात निर्माण होणारा ओला कचरा जिरविण्यासाठी आपण पालापाचोळ्याचा वापर करायचा. ओल्या कचऱ्याचे मातीमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेमध्ये तीन घटक महत्त्वाचे आहेत.
अ – air म्हणजे प्राणवायू
ळ – temperature म्हणजे तापमान
ट -moisture म्हणजे ओलाव्याचे प्रमाण
कचऱ्याचे कंपोस्ट होताना प्राणवायूची गरज असते. तो न मिळाल्यास कचरा कुजतो व वास येतो. त्यामुळेच कचऱ्याचे कंपोस्ट करण्याच्या कंटेनरला भरपूर भोकं असावी लागतात. नाही तर कचरा हलवून हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी लागते.
घरगुती ओल्या कचऱ्यात खूप ओल असते. पण पालापाचोळा पूर्ण कोरडा असतो. त्यामुळे ओल्या कचऱ्यावर कोरडय़ा पालापाचोळ्याचा थर द्यायचा. (ओला कचरा – कोरडा पाला एकत्र करून भेळ करायची वरती कल्चरचे पाणी शिंपडायचे. त्यामुळे सुक्ष्मजीवांचं विरजण कचऱ्यास लागेल.)
ओला कचरा व कोरडा पाला एकत्र करण्याचे आणखी महत्त्वाचे एक कारण म्हणजे वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थामध्ये कार्बन नायट्रोजनचे प्रमाण वेगवेगळे असते. सेंद्रिय पदार्थाची माती होण्यासाठी C : N (कार्बन नायट्रोन रेशो) हा २५ : १ ते ४० : १ इतका असावा लागतो.
म्हणून वेगवेगळे घटक एकत्र केल्याने मातीची प्रत सुधारते व कंपोस्ट होण्याची क्रिया चांगली होते. प्रक्रिया सुरू असताना तापमान ६० अंश सेल्सियसपर्यंत वाढते. आपण पिंप/कंटेनर किंवा खड्डय़ाजवळ हात नेल्यास हातास उष्णता जाणवेल. या उष्णतेमध्ये जगू शकणारे सुक्ष्मजीव कचरा विघटनाचे काम अखंड करत असतात. हळूहळू उष्णता कमी होते. काळपट रंगाचे मिश्रण तयार होते. जे हातात घेऊन हात झटकले तरी हातात चिकटत नाही. यात खराब वास येत नाही.
कदाचित काही पाने काळपट पडतील पण आकार टिकवून असतील. महागुनीची फणसाची पाने खूप दिवस आकार टिकवून असतात. तर, अशोक, शिरीष, आंब्याची पाने पटकन जिरतात. पण यामुळे आपल्या झाडांना हळूहळू वेगळ्या टप्प्यात पोषक द्रव्ये उपलब्ध होतात. काळा झालेला हा पाला झाडांच्या मुळाशी घातला तरी चालेल. कारण सुरुवातीचा तापमानवाढीचा काळ संपलेला असतो. घरातील गरजेनुसार, उपलब्ध वेळेनुसार निर्माण होणारा कचरा किती आहे त्याप्रमाणे योग्य तो कंटेनर (प्लास्टिकचे पिप, बादली, माठ, बांबूची जाळी, लोखंडी जाळी, नायलॉनची पिशवी) निवडावा. प्लॅस्टिक कंटेनरला भोके पाडावीत. ओलीचे प्रमाण योग्य असेल असे बघावे. विरजण म्हणून शेण पाण्यात घालून शिंपडावे. शेणाची उपलब्धता नसेल तर बाजारात इनोराची काळी पावडर किंवा कश्एट द्रावण मिळते ते फवारावे. ओल्या हिरव्या कचऱ्यावर पालापाचोळा व कोकोपीथचा थर दिल्याने मिश्रण ढवळण्याची गरज पडत नाही. तसेही कचरा ढवळायला कोणाला आवडते? पालापाचोळा आपले काम कमी करते. ज्यांच्याकडे कमी ओला कचरा निघतो त्यांनी कुंडीतील एका कोपऱ्यातील माती बाजूला करून त्यात चहापत्ती, गाजर, काकडी साले घालून वरून मातीने बंद करावे, कारण जीवजंतूंना अंधारात काम करायला आवडते व यामुळे मातीचे सतत पोषण होते, वेगळे खतपात्र करण्याची गरज भासत नाही. कंपोस्ट व गांडूळखत यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. कंपोस्टमध्ये सुक्ष्मजीव काम करतात व तापमान वाढते. तर, गांडुळांना गारवा व ओलावा आवडतो. गांडुळांना स्वयंपाकघरातील ओला कचरा आवडतो. याचा पातळ थर केल्यास त्यात गांडुळे मजेत राहतील. लोक सांगतात, ‘अहो, खड्डय़ात गांडुळे सोडली होती पण ती राहिली नाहीत.’ नाहीच राहणार कारण खड्डय़ातील उष्णता त्यांना सोसणार नाही. त्यांच्यासाठी पसरट खोकी अथवा मातीची कुंडी वापरा. गांडुळे मुद्दाम विकत आणायची गरज नाही. एखादी निसर्गप्रेमी मत्रीण तिच्याकडची गांडुळे तुम्हाला भेट देईल आणि रोजचा ओला कचरा जिरवण्यासाठी सध्या निसर्ग पानं गाळतोच आहे. म्हणूनच ही पानगळ ही पर्वणी आहे.
प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)