शहरात झालेल्या पावसामुळे १४ ठिकाणी झाडे कोसळली. मध्यरात्री पुणे स्टेशन, अलंकार टॉकीज येथे मोठे झाड कोसळले. पहाटे बिबवेवाडी, झाला कॉम्प्लेक्स येथे झाड पडून एमएनजीएलची गॅस वाहिनी तुटली असून कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला असून गेल्या दोन दिवसात अग्निशमन दलाकडे पावसामुळे १४ झाडपडी तर ७ ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.
पुणे : जोरदार पावसामुळे १४ ठिकाणी झाडे कोसळली
अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे

First published on: 01-09-2022 at 09:58 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trees fell at 14 places due to heavy rain pune print news tmb 01