लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुसळधार पावसामुळे सोमवारी संध्याकाळी शहरात २५ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन कोसळलेली झाडे हटवली. एम्प्रेस गार्डन परिसरात एका मोठ्या मोटारीवर झाड कोसळले. अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडावर पडलेली फांदी हटवून मोटारीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून शहरात पूर्व मोसमी पाऊस पडत आहे. दुपारनंतर आभाळ भरून येऊन जोरदार वाऱ्यासह तास-दीडतास पडणारा पाऊस झोडपून काढत आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडपडीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

आणख वाचा-पुण्यातील पोर्श गाडी अपघात प्रकरणाची देवेंद्र फडणवीसांकडून दखल; कठोर कारवाईचे दिले आदेश

सोमवारी संध्याकाळी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे २५ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या सहकारनगर, कात्रज ,वानवडी शिवदर्शन, मार्केटयार्ड भागात झाडे कोसळल्याची घटना घडल्या. एम्प्रेस गार्डन परिसरात मोटारीवर झाड पडल्याने चालक ज्ञानेश्वर भासीपल्ले जखमी झाला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला मार लागला असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

Story img Loader