शहरात सात ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यात पडलेल्या झाडाच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू होता. शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. पावसामुळे झाडांच्या फांद्या कमकुवत झाल्या आहेत. कर्वेनगर, दशभुजा गणपती, मार्केट यार्डातील गंगाधाम चौक, सॅलसबरी पार्कमधील पूनावाला गार्डन, शंकरशेठ रस्त्यावरील मोलेदिना हायस्कुलसमोर झाडे पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

झाडे तसेच फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला. सुदैवाने या घनटेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.