पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग, सोमवार पेठ, शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम, मॉडेल कॉलनी, येरवड्यातील नागपूर चाळ, गोल्फ क्लब चौक, हडपसरमधील ससाणेनगर, ताडीवाला रस्त्यावरील राजगुरू चौकात झाडे पडली. दोन ठिकाणी झाडे पडल्याने मोटारींचे नुकसान झाले आहे. झाडे पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले, दरम्यान, झाडे पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trees fell eight places heavy rains incidents falling trees pune print news ysh