शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात झाडे पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. डेक्कन जिमखाना भागातील बीएमसीसी रस्ता, शिवाजीनगर न्यायालयाचे आवार तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. शुक्रवारी (३० सप्टेंबर) दुपारी चारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला.
अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडे पडल्याच्या घटना घडल्या. झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांना घटनास्थळी धाव घेऊन फांद्या हटविल्या. अर्धा तास झाल्याने मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात रस्त्यावर पाणी साठले होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.