आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने आदिवासींमधील लोप पावत चाललेल्या परंपरांच्या लघुपट, माहितीपटाच्या माध्यमातून नोंदी व्हाव्यात या उद्देशाने हे काम आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे देण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र २०११ पासून हे काम ठप्प झाले आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.
लळित रंगभूमीचे अध्यक्ष कुंडलिक केदार यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली आहे. केदार यांनी स्वत: आदिवासींवर आधारित काही लघुपट तयार केले आहेत. मात्र, पुढे त्यांना संधी देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. २०११ सालानंतर तर एकाही लघुपटाची निर्मिती झालेली नाही, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आदिवासींच्या प्रथा, परंपरा, कला, चालीरीती यांच्या नोंदी होण्यासाठी ही बाब आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा