लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव रोखण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख नेताजी काशिद यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे दावा दाखल केला आहे.

Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक
issue in pimpri assembly constituency
गुन्हेगारी, अतिक्रमणे, अनारोग्य आणि प्रदूषण; वाचा कोणत्या मतदारसंघात आहेत ‘या’ समस्या

ह्युमन राइट असोशिएशन फॉर प्रोटेक्शनचे अध्यक्ष एम. डी. चौधरी यांच्या मार्फत काशिद यांनी हा दावा दाखल केला आहे. शहरात २०२२-२३ या वर्षात दहा हजार ३५० नागरिकांचा मोकाट श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिका प्रशासन मोकाट श्वानांची नसबंदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, मोकाट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. श्वानांकडून लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनाही वाढत आहेत. मोकाट श्वानांचा उपद्रव रोखण्याची मागणी करूनदेखील प्रशासन कोणत्याही ठोस उपाययोजना राबवित नसल्याने राज्य मानवी हक्क आयोगात दावा दाखल केला असल्याचे काशिद यांनी सांगितले.

आणखी वाचा- पिंपरीतील बेकायदा जाहिरात फलकधारकांना दोन वर्षांची रक्कम भरण्याचा न्यायालयाचा आदेश

शासनाच्या निर्देशानुसार श्वानांवर शस्त्रक्रिया, लसीकरण केले जाते. श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. -डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी पिंपरी महापालिका