पुण्यातील नवले ब्रिज येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळ वरून फरार झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले ब्रिज येथील मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या भूमकर पुलाच्या उतारावर आयशर ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना त्याने काही अंतर फरफटत नेले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. ट्रकने काही चारचाकी वाहनांनादेखील धडक दिली. ट्रकने दिलेल्या धडकेमुळा या वहानांचंही नुकसान झालं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck accident cause three deaths in pune svk 88 sgy