पुणे : कल्याणीनगर चौकात सात महिन्यांपूर्वी दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाला चिरडून पसार झालेल्या ट्रकचालकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. ट्रकच्या मालकाचा शोध घेऊन चालकाला ताब्यात घेण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहंमद अशीम हातीम अन्सारी (वय ३४, रा. कुन्हार कला, जि. हजारीबाग, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कल्याणीनगर भागात २० जानेवारी रोजी ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार गौरव खंडारे गंभीर जखमी झाला. गौरवबरोबर असलेला सहप्रवासी मित्र इशान सुनील करवडे (वय ३४) ट्रकच्या चाकाखाली सापडला. ट्रकचालक अन्सारीने ट्रक थांबविला नाही. ट्रकच्या चाकाखाली इशना चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

हेही वाचा >>>रेल्वेत प्रवासात तब्येत बिघडली? काळजी करू नका, तातडीने डॉक्टर हजर होणार

अपघातानंतर येरवडा पोलिसांनी तपास सुरू केला. पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी अनिल शिंदे यांनी जवळपास शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. ट्रकवरील वाहन क्रमांकाची पाटी चित्रीकरणात दिसली. त्यानंतर पोलिसांनी ट्रकमालकाचा शोध घेतला. अपघात घडला तेव्हा ट्रकवर अन्सारी चालक असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अन्सारीला पकडले.

हेही वाचा >>>Pune Crime News: पुण्यात रस्त्यावर होणाऱ्या वादातून मारहाणीचे प्रकार वाढीस; अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराला गजाने मारहाण

पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, छगन कापसे, उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस कर्मचारी दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck driver who crushed a young man in kalyaninagar chowk arrested after seven months pune print news rbk 25 amy