पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये चिंचवड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि त्यांचे दिर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पाठोपाठ तीन वेळेस नगरसेवक राहिलेले चंद्रकांत नखाते यांनी देखील चिंचवड विधानसभेवर दावा करत घराणेशाहीला विरोध केला आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, अशी टीका चंद्रकांत नखाते यांनी जगताप कुटुंबावर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुक ही अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मतदार संघावर रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये चिंचवड विधानसभेवरून जगताप कुटुंबात रस्सीखेच सुरू असताना आता तीन वेळेस नगरसेवक राहिलेले भाजप चे चंद्रकांत नखाते यांनी चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे.

हेही वाचा…धक्कादायक : पत्नीचा चाकूने गळा चिरून खून; सातारा रस्त्यावरील लॉजमधील घटना

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांना वरिष्ठ नेत्यांनी आगामी विधानसभेबाबत शब्द दिला होता. त्यामुळे ही विधानसभा मी लढवणार असल्याचं ठाम मत चंद्रकांत नखाते यांनी व्यक्त केल आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मुळात आधीच विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबात भाजप उमेदवारी देणार नाही, कारण भाजपमध्ये घराणेशाहीला झुकता माप दिल जात नाही. अस स्पष्ट मत व्यक्त करत चंद्रकांत नखाते यांनी जगताप कुटुंबावर टीका केली आहे. चिंचवड विधानसभेबाबत भाजपमध्येच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे भाजप कोणाला उमेदवारी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.