पुणे : आरोग्य सेवा रुग्णकेंद्री करण्यासाठी माहितीवर (डेटा) आधारित निर्णय घेणे आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख आरोग्य व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे मत आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.आरोग्य सेवा आयुक्त पदाचा कार्यभार घेतल्यानंतर मुंढे यांनी पुणे येथील आरोग्य सेवा विभाग प्रमुखांची बैठक घेतली आणि मार्गदर्शन केले. तुकाराम मुंढे म्हणाले, आरोग्यसेवांविषयक माहिती अद्ययावत ठेवून त्यांचा वापर नियोजन आणि संस्थांच्या विकासासाठी करणे, ऋतूनिहाय आरोग्य सेवांचे नियोजन करणे, साथरोगांवर नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांशी समन्वय आवश्यक आहे. जिल्हा आणि गाव पातळीवरील संस्थांशी चांगला संवाद ठेवून दैनंदिन आढावा घेतला जावा अशा सूचनाही मुंढे यांनी या वेळी केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा