पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली पीएमपीएल संचालक मंडळाची पहिली बैठक वादळी ठरली आहे. महिलांसाठी विषेश बस सेवेच्या संदर्भातील मुद्द्यावर पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा साळवे आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात शुक्रवारी शाब्दिक वादावादी झाली. या बैठकीतील वादावर साळवे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड या शहरात कामानिमित्त महिला पीएमपीएलने प्रवास करतात. प्रवासादरम्यान महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरु करण्याची मागणी या बैठकीत केली. या मागणीवर पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांसाठी बस असल्याची माहिती मुंढे यांनी दिली. याप्रकारानंतर ‘तुम्हाला पाहिजे तसे काम करा’, असे सांगत टेबलवर फाईल आपटत मुंढे सभागृहातून बाहेर पडत होते. त्यावेळी सदस्यांनी त्यांना बसण्याची विनंती केली, अशी माहिती त्यांनी दिली.
तुकाराम मुढेंना राग अनावर! म्हणाले, तुम्हाला पाहिजे तसे काम करा!
मुंढे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा साळवे यांच्यात शाब्दिक वाद
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-06-2017 at 18:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tukaram munede first meeting with pmpl chairman committee member in pune