पुणे : पोटातील तब्बल साडेपाच किलो वजनाच्या गाठीमुळे प्रकृतीच्या विविध तक्रारींचा सामना करणाऱ्या महिलेला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. संबंधित महिला ३८ वर्षांची असून मासिक पाळीच्या तक्रारी, ओटीपोटात दुखणे, अनियमित रक्तस्त्राव अशा समस्यांनी ग्रासली होती. तिच्या रक्तातील लोहाची पातळीही ३.४ पर्यंत कमी झाली होती. उपचारांचा भाग म्हणून तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटात साडेपाच किलो वजनाचे फायब्रॉईड असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खराडी परिसरातील मदरहूड रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. प्रीतिका शेट्टी म्हणाल्या,की एक वर्षापासून या रुग्णाला मेनोरेजिया म्हणजे जास्त आणि दीर्घकाळ रक्तस्त्रावाची समस्या होती. सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या गर्भाशयाला इजा आणि मोठी गाठ असल्याचे दिसून आले. गर्भाशयातील गाठी या बहुतांशवेळा कर्करोगकारक नसतात. तिच्या मूत्रपिंडावर ही गाठ असल्याने दोन्ही मूत्रवाहिन्यांच्या कार्यात अडथळा येत होता. तिचा मूत्रमार्ग पूर्ववत करणे,तसेच गाठ काढणेही आवश्यक होते. त्यामुळे तिच्या संमतीने तिचे गर्भाशय काढून टाकण्यात आले.

डॉ. शेट्टी म्हणाल्या,की मासिक पाळीतील रक्तस्त्राव दीर्घकाळ सुरू राहणे, थकवा, अतिरिक्त वेदना ही चिंतेची कारणे आहेत. या लक्षणांकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. नियमित व्यायाम, आहार आणि विश्रांती यांचे वेळापत्रक सांभाळावे. मासिक पाळीच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. शेट्टी यांनी केले.