पुणे : ऐन सणासुदीत तूरडाळ महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांवर असलेली तूरडाळ आता १६० ते १७० रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी २० रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढय़ा दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. तूरडाळ दोन महिन्यांत १०० ते ११० रुपयांवरून १६० ते १७० रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळ ५७ ते ५८ रुपयांवरून ७० रुपये प्रति किलोवर गेली (पान ४ वर) (पान १ वरून) आहे. उडीद डाळ ९० रुपयांवरून ११० रुपये प्रतिकिलो झाली असून, मसूर डाळही ५८ ते ६० रुपयांवरून ७०-७२ रुपयांवर गेली आहे. मूग डाळ ८० ते ८५ रुपयांवरून ११० रुपयांवर गेल्याची माहिती डाळीचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.३७ चा नीचांक
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
Foodgrain production during Kharif season Crop wise production forecast of Central Government Mumbai
यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार; जाणून घ्या, केंद्र सरकारचा पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज
Exports of the country crossed the mark of 800 billion dollars
देशाची निर्यात ८०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल!

हेही वाचा >>> “…आम्ही तिथे नसतो”, इंडिया आघाडीतल्या प्रवेशावर राजू शेट्टींचं मोठं वक्तव्य

खरीप हंगामात अवकाळी, गारपीट, उष्णतेच्या झळांमुळे कडधान्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. देशात डाळींचा तुटवडा जाणवू नये, यासाठी केंद्र सरकारने कडधान्ये, डाळींच्या आयातीवरील कर २९ मार्च २०२२ रोजी हटवला. ३१ मार्च २०२४ पर्यंत डाळींच्या आयातीवर कोणताही कर असणार नाही. तरीही अपेक्षित प्रमाणात डाळींची आयात होताना दिसत नाही. देशात उत्पादित झालेली तूर पावसात भिजल्यामुळे दर्जा घसरला आहे. १०० किलो तुरीपासून जेमतेम ६०- ६५ किलो डाळ मिळते आहे. त्यामुळे डाळमिल चालकही चांगल्या तुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून शेतकरी विक्री करत असलेल्या तुरीला मंगळवारी, २९ ऑगस्ट रोजी सरासरी १०,००० ते १३,००० रुपये दर मिळाला. त्यावर प्रक्रिया, वाहतुकीसह अन्य खर्च गृहीत धरता नजीकच्या भविष्यात तूरडाळीच्या दरात घट होण्याची शक्यता दिसत नाही, असेही नहार यांनी सांगितले.

कडधान्य लागवडीत घट

देशभरात खरीप हंगामात कडधान्यांच्या लागवडीत घट झाली आहे. जूनअखेपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तरच कडधान्यांची लागवड होते. यंदा जुलैअखेरीस पाऊस झाल्यामुळे कडधान्यांचा पेरा घटला आहे. गेल्या वर्षी २५ ऑगस्टअखेर देशात १२८.०७ लाख हेक्टरवर कडधान्यांची लागवड झाली होती. यंदा ती ११७.४४ लाख हेक्टरवर घसरली आहे. तुरीची लागवड ४२.११ लाख हेक्टर, उडीद ३१.१० लाख हेक्टर, मूग ३०.६४ लाख हेक्टर कुळीथ ०.२६ लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची १३.३४ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवडीत घट झाल्यामुळे पुढील वर्षभर डाळींचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.