दत्ता जाधव, लोकसत्ता
पुणे : पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या मराठवाडय़ाने हळद उत्पादनात मोठी आघाडी घेतली आहे. विशेषकरून हिंगोली, परभणी, वाशिम, जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात हळदीच्या लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेत हळदीची आर्थिक उलाढाल वाढल्यामुळे सांगलीतील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने हिंगोलीत सुरू केली आहेत.
सांगलीत यंदा या भागातील हळदीचे सरासरी उत्पादन १५ लाख पोती (एक पोते ५० किलोचे) राहिले. या तुलनेत मराठवाडय़ातील हळदीचे उत्पादन सुमारे ३०-३२ लाख पोत्यांच्या घरात गेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाजार समितीत हळदीची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. हळद खरेदीसाठी आजवर उत्तर भारतातून सांगलीत येणारे व्यापारी आता वसमतमध्ये हळदीची खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे सांगली बाजार समितीतील आठ व्यापाऱ्यांनी वसमत येथे आपली खरेदी-विक्री, अडत्याची दुकाने सुरू केली आहेत.
दर्जात सांगलीच अव्वल..
सांगली परिसरात शेलम आणि राजापुरी हळदीचे उत्पादन घेतले जाते. सांगली भागातील राजापुरी हळद दर्जेदार मानली जाते. मराठवाडय़ात शेलम आणि फुले स्वरूपा या जातीचे उत्पादन घेतले जाते. मराठवाडय़ातील हळदीचा दर्जा मध्यम प्रतिचा असतो. त्यामुळे ही हळद तुलनेने स्वस्त असते. या हळदीचा उपयोग प्रक्रिया उद्योग आणि आखाती देशांत नियातीसाठी केला जातो, अशी माहिती सांगलीतील व्यापारी मनोहरलाल सारडा यांनी दिली.
वाढ किती.
हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथील प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ मध्ये हिंगोलीत ४९,७६४, नांदेडमध्ये १३,१३१, वाशिममध्ये ४,१४९, परभणीत ३,१५१, बुलडाण्यात १,७६३ आणि जालन्यात १,०७७ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. या भागातील हळदीचे क्षेत्र अत्यंत वेगाने वाढले आहे. २०१७ मध्ये हिंगोलीत हळदीचे क्षेत्र फक्त ५,०२८, नांदेडमध्ये ३,१२७ आणि परभणीत १,१८८ हेक्टर होते.
थोडी माहिती.. मराठवाडय़ात पाणीटंचाई आहे. पण, गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, बीज प्रक्रिया आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे येथील हळदीच्या उत्पादनातही वाढ झाली आहे.
बदल का झाला?
वाई, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभाग आजवर हळद उत्पादनात अग्रेसर होता. आता या भागातील शेतकरी, फळपिके आणि ऊस शेतीकडे वळाले आहेत. त्यामुळे येथील हळदीचे क्षेत्र आणि उत्पादन कमी झाले आहे, असे सांगली बाजार समितीतील हळदीचे ज्येष्ठ व्यापारी गोपाळ मर्दा यांनी सांगितले.
दर घसरले.. गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी सुमारे २५ लाख पोती हळद शिल्लक राहत आहे. या शिल्लक हळदीमुळे यंदा हळदीचे दर दबावाखाली होते. एप्रिल महिन्यांच्या तुलनेत आता दरात सरासरी १५०० ते २००० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. दरवर्षी देशात सरासरी ५० किलोंची एक लाख पोती हळदीचे उत्पादन होते. त्यापैकी देशांतर्गत गरज आणि निर्यातीसाठी सुमारे ८० लाख पोत्यांची विक्री होते.