पुणे : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेमुळे चर्चेत आलेले जालन्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची पुणे लोहमार्ग अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोशी यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी नियुक्तीचे आदेश गृहविभागाने नुकतेच दिले होते. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी गृहविभागाने दोशी यांची सीआयडीतील बदली रद्द करुन लोहमार्ग पोलीस दलात नियुक्तीचे आदेश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंतरवाली सराटीत झालेल्या गोळीबारानंतर दोशी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. दोशी यांची सीआयडीच्या अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली होती .सीआयडीतील नियुक्तीवरुन विरोधकांनी गृहविभागाच्या कारभारावर टीका केली होती. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोशी यांची लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tushar doshi transfer to cid canceled after shooting in antarwali sarati pune print news rbk 25 amy