गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ७.२५ टक्क्यांनी वाढ

पुणे : राज्य मंडळाने जाहीर के लेल्या बारावीच्या निकालात पुणे विभागाचा निकाल ९९.७५ टक्के  लागला. पुणे विभागात येणाऱ्या पुणे जिल्ह्य़ाचा निकाल ९९.७२ टक्के , अहमदनगर जिल्ह्य़ाचा निकाल ९९.७८ टक्के  आणि सोलापूर जिल्ह्य़ाचा निकाल ९९.८० टक्के  लागला. पुणे विभागाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७.२५ टक्क्यांनी वाढला आहे.

पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी निकालाची माहिती दिली. विभागातील २ लाख ३१ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी के ली होती. अंतर्गत मूल्यमापन झालेल्या २ लाख ३१ हजार ३३१ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ३० हजार ७६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णामध्ये १ लाख २६ हजार ५४१ मुले (९९.७१ टक्के ), तर १ लाख ४ हजार ३१६ मुली (९९.८० टक्के ) आहेत. विभागात विज्ञान शाखेतील १ लाख ३ हजार ८८७, कला शाखेतील ५४ हजार १५७, वाणिज्य शाखेतील ६४ हजार ५२४ आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचे ८ हजार १९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी १ लाख १४ हजार ६६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के  किं वा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा ९९.७३ टक्के , कला शाखेचा ९९.७५ टक्के , वाणिज्य शाखेचा ९९.५१ टक्के , व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा ९९.२९ टक्के  निकाल लागला.

कला शाखेत ९२४, विज्ञान शाखेत ९८५,वाणिज्य शाखेत ६७०, व्यवसाय शिक्षण शाखेत १४९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के  लागला. गेल्या वर्षी विभागाचा निकाल ९२.५० टक्के  लागला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ७.२५ टक्क्यांनी वाढला आहे.

जिल्हानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

पुणे जिल्ह्य़ातील उत्तीर्ण विद्यार्थी – १ लाख १८ हजार ६८०

अहमदनगर जिल्ह्य़ातील उत्तीर्ण विद्यार्थी – ६१ हजार ७८१

सोलापूर जिल्ह्य़ातील उत्तीर्ण विद्यार्थी – ५० हजार ३००

Story img Loader