सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या फाऊंडेशन परीक्षेचा निकाल द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) बुधवारी जाहीर केला. त्यात देशभरातील २५.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
आयएआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. आयसीएआयकडून जूनमध्ये देशभरातील ५०८ केंद्रांवर फाऊंडेशन परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी नोंदणी केलेल्या १ लाख ४ हजार ४२७ विद्यार्थ्यांपैकी ९३ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यात ५१ हजार १११ मुले, तर ४२ हजार ६१८ मुली होत्या. निकालात १३ हजार ४३ मुले, १० हजार ६५० मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २५.५२ टक्के, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २४.९९ टक्के आहे.