घरातील कोणी नसल्याचे पाहून २० लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार चिखलीतील सोनवणे वस्तीत उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शरद पंडीत सोनवणे (वय – ३३. रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान सोनवणे कुटुंबीय देवदर्शनासाठी तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोटला गेले होते. बंद घरातील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील ११ लाख २३ हजार रूपयांचे दागिने आणि नऊ लाख रूपये रोख असे सुमारे २० लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गुमाणे करत आहेत.