पुणे : सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील २० जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

Balasaheb Thorat phone call, Sudhir Mungantiwar,
थोरात यांचा थेट वनमंत्र्यांना फोन… वनमंत्र्यांनी दिले बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश! नेमके काय घडले?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
cases of theft in Palghar district
पालघर पोलिसांकडून मालमत्ते संदर्भातील तीन गुन्ह्यांचा उकल
mandul snake that is sold for lakhs of rupees is given life
लाखो रुपयांना विकल्या जाणाऱ्या सापाला जीवदान
builders not require consent of slum dwellers for sra schemes over ten acres of land
मुंबईतील मोठ्या झोपडपट्ट्या थेट विकासकांना खुल्या
Two policemen arrested for kidnapping and demanding ransom nagpur
पोलिसांना झाले तरी काय ? अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या दोन पोलिसांना अटक
Fraud of crores by pretending to get good returns by trading in stock market
धक्कादायक! सायबर चोरट्यांनी केली एवढ्या कोटींची फसवणूक, कुठे घडला प्रकार?

हेही वाचा : पुणे : कामामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीची जबाबदारी मेट्रोची ; महापालिकेचे महामेट्रोला आदेश

सोमवारी दिवसभरात आढळलेल्या २० नवीन रुग्णांपैकी १२ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. सहा रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर दोन रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारी आढळलेल्या २० नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १५ लाख दोन हजार ६२८ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ५२६ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.