मुंबई इंडियन्स विरुद्ध हैद्राबाद सनराईज क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. काळेवाडीत बंद फ्लॅटमध्ये आरोपी हरीश दयालदास गुलानी आणि कमल गुरूमुखदास सचदेव हे दोघे सट्टा घेत होते. बुकींच्या मोबाईलमध्ये क्रिकेट लाईव्ह गुरू नावाचे ऍप आढळले आहे. टीव्ही प्रक्षेपणाच्या अगोदर त्या ऍपवर काही सेकंद सामना दिसायचा याचा फायदा घेऊन आरोपी सट्टा घ्यायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड आयुक्तालयात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध हैद्राबाद सनराईज क्रिकेट सामन्यावर काही जण बेटिंग घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांना मिळाली. त्यानुसार, काळेवाडी विजयनगर येथील अदी अम्मा ब्लेस हौसिंग सोसायटीत पहिला मजला फ्लॅट नंबर १०३ मध्ये सट्टा घेणाऱ्या गुलानी आणि सचदेव ला ताब्यात घेतले. तीन मोबाईल, एक नोटबुक, जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण २५ हजारांच्या मुद्देमाल आरोपीकडून पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!
three crores found in atm van
नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
An attempt by the accused in the Bopdev Ghat case to mislead the police Pune news
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
Ramtekadi dumper and JCB burnt
पुणे: रामटेकडीत डंपर, जेसीबी यंत्र पेटवून देण्याची घटना; ठेकेदाराकडून पोलिसांकडे तक्रार
bomb threat jagdish uikey arrested
विमान कंपन्यांना १०० हून अधिक धमक्या पाठविणारा जगदीश उईके कोण?