महापालिका भवन परिसरात लावण्यात आलेली पीएमपी बस चोरणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. त्या वेळी बस केबीनवर आदळल्याने केबीनचे नुकसान झाले. सूरज शशिकांत जडिवे (वय ३५, रा. चिंतामणी पॅरेडाईज, भारतीनगर, कोथरुड), मोहित अविनाश चव्हाण (वय २६, रा. जनवाडी, गोखलेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत जालिंदर खंडाळे (वय २७, रा. पर्वती दर्शन) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : तरुणाची मैत्रिणीसमोर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या ; सिंहगड पायथा परिसरातील एका हॉटेलमधील घटना

खंडाळे हे पीएमपीत सुरक्षारक्षक आहेत. मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास जडिवे आणि चव्हाण महापालिका भवन परिसरात आले. श्रमिक भवनजवळ लावलेली बस चोरट्यांनी चालू केली. दोघे जण बस घेऊन पसार होण्याच्या तयारीत होते. त्या वेळी खंडाळे आणि सहकारी भीमराव सोनवणे तेथे होते.

बस चोरुन नेण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना सोनवणे यांनी पाहिले. खंडाळे आणि सोनवणे यांनी दोघांना पकडले. त्या वेळी बस थांब्याच्या परिसरातील केबीनवर बस आदळल्याने केबीनचे नुकसान झाले. पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. शिंदे तपास करत आहेत.