पुणे : जुन्नर परिसरातील तांबेवाडीतील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे यांचा खून करून पसार झालेल्या दोघा आरोपींना ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले. व्यावसायिक स्पर्धेतून आरोपींनी तांबे यांचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी पांडुरंग जिजाभाऊ तांबे (वय ३९, रा. तांबेवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे), महेश गोरखनाथ कासार (वय ३०, रा. आळे फाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी किशोर तांबे यांचा खून व्यावसायिक स्पर्धा, तसेच बदनामी केल्याच्या रागातून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

हेही वाचा – मा. प. मंगुडकर यांचे निधन

हेही वाचा – पुण्यातील कोंढव्यात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे बुकी पोलिसांच्या जाळ्यात; नऊजणांना अटक

५ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास किशोर तांबे शेतात जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांकडून ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तांबे यांचा शोध‌ घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केलीत. तांबे यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तांबे यांचा खून आरोपी पांडुरंग तांबे, महेश कासार यांनी केल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. पाेलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा दोघांनी तांबे यांना दारू पाजून त्यांच्या डोक्यात गज मारला. तांबे यांचा मृतदेह मुरलीधर पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत टाकल्याची कबुली दिली. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested in murder case of kishore tambe director of various executive societies in junnar pune print news rbk 25 ssb
Show comments