शहरात गांजा, अफू विक्रीसाठी आलेल्या महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. दोघांकडून अफू, गांजा असे तीन लाख २२ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. हडपसर आणि भारती विद्यापीठ परिसरात ही कारवाई करण्यात आली.  वीरमाराम  बिश्नोई (वय ३०, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पथक भारती विद्यापीठभ भागात गस्त घालत होते.

हेही वाचा >>> पुणे: चंदननगर भागात सोसायटीच्या आवारातील रोहित्राला आग 

Drunk driver hits police constable incident in Kalyaninagar area
मद्यपी वाहनचालकाकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की, कल्याणीनगर भागातील घटना
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
Crime against women prostitution in Navale Pool area
नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या महिलांवर गुन्हा, नागरिकांच्या तक्रारीनंतर कारवाई
fda meswak
मुंबई: मेसवाक दंतमंजनवर एफडीएची कारवाई, ४१ लाख रुपयांचा साठा जप्त
Badlapur Case, High Court, police duty,
बदलापूर प्रकरण : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली ? उच्च न्यायालयाचा सवाल
Rajasthan gang arrested for deceiving couriers with drugs
पिंपरी : कुरीअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून फसवणार्‍या राजस्थानच्या टोळीचा पर्दाफाश; पाऊणकोटीचा मुद्देमाल जप्त

भारती विहार सोसायटी परिसरात एकजण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने बिश्नोईला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख १० हजार रुपयांची १५० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. मांजरी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेला ताब्यात घेवून तिच्याकडून १२ हजार रुपयांचा ६३२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी महिलेविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा >>> खडकवासला धरण साखळीत ५२ टक्के, तर १५.१६ टीएमसी इतका पाणी साठा जमा

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, प्रवीण उत्तेकर, संदीप शिर्के, पांडुरंग पवार, सचिन माळवे आदींनी ही कारवाई केली.