खडकी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ किलो गांजा, दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवीन उमाकांत पिल्ले (वय ३४, रा. खडकी), जितेंद्र कुलदीपसिंग मुलगानी (वय ३२, रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पिल्ले आणि मुलगानी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला.

हेही वाचा >>> पुणे :‘डीआरडीओ’चे संचालक कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश

50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
onion crisis in maharashtra loksatta analysis how long shortage of onion remain in india
विश्लेषण : कांद्याचा तुटवडा का आणि किती दिवस?
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

पोलिसांना पाहताच पिल्ले आणि मुलगानी दुचाकीवरुन पसार झाले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत २२ किलो गांजा सापडला. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसाेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक अमर कदम,  उपनिरीक्षक वैभव मगदूम, उपनिरीक्षक भानुदास भालेराव,   तानाजी कांबळे, संदेश निकाळजे, जहांगिर पठाण, ऋषिकेश दिघे, शिवराज खेड  सागर जाधव आदींनी ही कारवाई केली.