लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात तिघे जण जखमी झाले. हडपसर आणि लोणी काळभोर भागात अपघाताच्या घटना घडल्या. अपघातात मृत्युमुखी पडलेला दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले आहे.

हडपसर भागातील काळेपडळ रेल्वे भुयारी मार्गाजवळ दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक दिली. अपघातात दुचाकीवरील तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातात बबलू तात्या जाधव (वय १५, रा. स्वामी समर्थ कॉलनी, हडपसर) याचा मृत्यू झाला. अपघातात तात्या रामा पवार, ओंकार परमेश्वर थोरात, संग्राम मुंगसे जखमी झाले. अपघातास जबाबदार असल्याप्रकरणी ओंकार परमेश्वर थोरात (रा. संकेत पार्क, काळेपडळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल तात्या जाधव (वय २३) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-Cyber Crime: काय सांगता? वर्षभरात ४२९ करोडचा नागरिकांना गंडा; ३७ हजार तक्रारी, नेमकं सायबर पोलीस काय म्हणाले? वाचा..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, दुचाकीस्वार बबलू जाधव बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास काळेपडळ येथील रेल्वे भुयारी मार्ग परिसरातून निघाला होता. त्यावेळी भरधाव वेगाने दुचाकीस्वार ओंकार थोरात निघाला होता. दुचाकींची समोरामसोर धडक झाली. अपघातात दुचाकीस्वार बबलू जाधव गंभीर जखम झाला. दुचाकीस्वार ओंकार, तसेच दुचाकीवरील सहप्रवासी तात्या पवार, संग्राम मुंगसे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्लया बबलूचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करत आहेत.

लोणी काळभोर परिसरातील थेऊर ते कोलवडी रस्त्यावर थांबलेल्या ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक दगडू बडेकर (वय ४१) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक पुष्पेंद्रकुमार इंद्रभान पटेल (रा. बडवार, जि. मेहेर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत दुचाकीस्वार बडेकर यांचे वडील दगडू गैबू बडेकर (वय ७१, रा. कोवडी माळवाडी, ता. हवेली ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत देशात पुणे पाचवे! जाणून घ्या सर्वाधिक गुंतवणूक कशात अन् गुंतवणूकदार कोण…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दीपक बडेकर थेऊर ते कोलवडी रस्त्यावरुन बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. ट्रकचे पाठीमागील बाजूचे दिवे सुरू नव्हते. रस्त्यात थांबलेला ट्रक न दिसल्याने दुचाकीस्वरा दीपक थांबलेल्या ट्रकवर आदळले. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.

Story img Loader