लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : हडपसर भागातील कालव्यात दोन मृतदेह सापडले. वाहून आलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. वैदुवाडी भागातील रहिवाशांनी कालव्यात दोन मृतदेह तरंगत असल्याचे सोमवारी रात्री पाहिले आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
आणखी वाचा-पिंपरी : अखेर नाशिक फाटा चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; लूप वाहतुकीसाठी खुला
अग्निशामक दलाचेही पथक तेथे पोहोचले. अग्निशमन दलातील जवानांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. वैद्यकीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. दोघांची नेमकी ओळख पटलेली नाही. शहरातून बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या नोंदीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हडपसर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.