लोकसत्ता प्रतिनिधी
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पुणे: पुणे नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात दोन बसची समोरासमोर धडक झाली. अपघातात चालक आणि वाहकासह २९ प्रवासी जखमी झाले आहेत.
महपालिका ते तळेगाव ढमढेरे मार्गावरील बस ही बीआरटी मार्गातून निघाली होती. त्यावेळी वाघोलीकडून निघालेली बस आदळली.
बसमधील चालक वाहक आणि प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये १७ महिलांचा समावेश असून जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींच्या चेहरा आणि हाताला दुखापत झाली आहे.
First published on: 01-08-2023 at 12:27 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two buses collided on the pune nagar road and 29 passengers were injured in the accident pune print news rbk25 dvr