लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: शिरूर येथील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली. पाण्यात बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी मोहीम राबविली. सायंकाळपर्यंत दोघांचा ठावठिकाणा लागला नाही. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.

अनुराग विजय मांदळे ( वय १६) आणि गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. अनुराग आणि गौरव रविवारी भीमा नदीत पोहण्यासाठी गेले होते. नदीच्या बंधाऱ्याचे ढापे उघडले असल्याने पाण्याचा प्रवाह सुरू होता. त्या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. त्यांच्यासोबत पोहणाऱ्या मुलांनी अनुराग आणि गौरव बुडाल्याचे पाहिले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.