पुणे : सोसायटीतील गटाराच्या झाकणावर फटाके फोडताना अचानक स्फोट झाल्याने दोन मुले जखमी झाल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली.
या घटनेची नोंद सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नऱ्हे भागातील एका सोसायटीच्या आवरात चेंबरच्या झाकणावर मुले फटाके फोडत होती. एकाने चेंबरच्या झाकणावर फटाका फोडला. त्यावेळी स्फोट झाला आणि गटाराचे झाकण तुटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा…‘रिपाइं’च्या सदस्यत्वाचा डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्याकडून राजीनामा, महायुतीमध्ये रिपाइंला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप

झाकणाचे तुकडे लागल्याने दोन मुले जखमी झाल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत पाच मुले जखमी झाली आहेत. या घटनेचे चित्रीकरण सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केले असून, समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित झाली.

हेही वाचा…राज्यातील सैनिकी शाळांच्या शुल्कात वीस वर्षांनी वाढ; ‘एनडीए’तील मराठी मुलांचा टक्का वाढविण्यासाठी धोरणात सुधारणा

दरम्यान, लहान मुले फटाके फोडत असताना पालकांनी त्यांच्या शेजारी थांबणे गरजेचे आहे. वीजेचा खांब, तसेच दुचाकीजवळ फटाके फोडू नयेत, असे आवाहन परिमंंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी केले आहे. गटारावर फटाके फोडताना नेमका स्फोट कसा झाला, याबाबतची माहिती मिळाली नाही.