विद्यापीठ रखवालदाराच्या खुनातील आरोपी मनीष नागोरी याने दिलेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी सुपारी घेऊन खून करणाऱ्या दोघांना गोव्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाबाबत चौकशी करण्यात येत आहे.
पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षक प्रल्हाद जोगदंडकर आणि डॉ. दाभोलकर यांच्या खूनामध्ये मारेकऱ्यांनी एकाच प्रकारचे पिस्तुल वारले आहे. विद्यापीठ खून प्रकरणी पोलिसांनी नागोरीसह चौघांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. नागोरीने ४७ जणांस शस्त्रास्त्र पुरविल्याचे समोर आले आहे. त्यानेच डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शस्त्र पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोव्यातून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे डॉ. दाभोलकर खून प्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. त्याच बरोबर सातारा येथील एका युवकाकडे ही तपास सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा