लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमी बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे रत्नागिरी आणि रायगडमध्ये दोन दिवस पावसाचे असणार आहेत. पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या पूर्व किनारपट्टीवर खेपुपारा नजीक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ते पुढील २४ तासात बांगलादेशाच्या किनारा ओलांडून पश्चिम बंगालच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा सकारात्मक परिणाम म्हणून मोसमी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासह अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमी बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस रत्नागिरी, रायगड; तसेच आणि पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-चुकीचे सरकार निवडल्याने कर्नाटक, राजस्थान कर्जबाजारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका 

किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भ, मराठवाड्यात पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two days of rain in ratnagiri raigad and it will increase in ghat area of pune and satara pune print news dbj 20 mrj
Show comments