बारामती : बारामतीतील माळेगाव परिसरात रायायनिक पदार्थांपासून तयार केलेली विषारी ताडी प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. राजू लक्ष्मण गायकवाड (वय ३५), हनुमंत मारुती गायकवाड (वय ४०, दोघे रा. चंदननगर, माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. माळेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा ताडीची विक्री सुरू होती. रविवारी (३० ऑक्टोबर) राजू गायकवाड आणि हनुमंत गायकवाड यांनी ताडी गुत्यावर ताडी प्यायली. त्यानंतर दोघांना त्रास झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘दोन जिवांचा नाहक बळी..’; पिंपरी पालिकेचा बेजबाबदार कारभार

दरम्यान, गायकवाड यांनी ताडी प्यायल्यानंतर भय्यू चिनाप्पा गायकवाड, सनी चिनप्पा गायकवाड, भिमा कलप्पा भोसले यांनी ताडी प्याली. मात्र, त्यांना कोणताही त्रास झाला नाही. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील ४८ तिघे जण वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली राहणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांकडून ताडी विक्री करणाऱ्या गुत्यांवर कारवाई सुरू करण्यात आली असून पोलीस अधिकारी किरण अवचार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two die poisonous toddy in baramati the police taking action pune print news ysh