पाषाण आणि बाणेर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाषाण परिसरात टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रकाश नरबहादूर कारकी (वय ३१, रा. बावधन) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत कारकी याची पत्नी बिश्ना (वय २८) हिने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण खंडणी प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडे

प्रकाश कारकी मूळचा नेपाळचा आहे. तो भाजी खरेदीसाठी पाषाण रस्त्याने निघाला होता. त्या वेळी भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार प्रकाशला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रकाशचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव तपास करत आहेत. बाणेर परिसरात पादचारी तरुणाला सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पंकज गौड (वय १८, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. गौड हा बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्याने निघाला होता. त्या वेळी सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने गौडला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी सुभाष वाळके यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died in different accidents in pashan baner area pune print news rbk 25 zws