पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात ‘सिम्बा’ आणि ‘जेम्स’ हे दोन श्वान दाखल झाले आहेत. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या श्वानांची पोलिसांना मदत होणार आहे.पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. १५ ऑगस्ट २०१८ रोजी ते कार्यान्वित झाले. पोलीस आयुक्तालयाला पाच वर्ष उलटून गेली तरी अनेक सुविधांची कमतरता आहे. पाच वर्षांनंतर दोन श्वान शहर पोलीस दलात दाखल झाले आहेत. ‘सिम्बा’ हा श्वान गुन्ह्यांशी निगडीत काम करणार आहे. चोरी, घरफोडी, खून यांसारख्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन आरोपींचा माग काढणे, हे त्याचे मुख्य काम असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘जेम्स’ हा श्वान बॉम्ब शोधक नाशक पथकात (बीडीडीएस) काम करणार आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांचा आहार, व्यायाम, प्रशिक्षण, औषधे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी हे प्रशिक्षक घेणार आहेत. पोलीस दलात असणाऱ्या श्वानांना सुरुवातीपासून जो प्रशिक्षक सांभाळतो, त्याचेच ते ऐकतात. त्यामुळे हे श्वान जिथे जातात तिथे त्यांचे प्रशिक्षक सावलीप्रमाणे सोबत असतात.

हेही वाचा >>>बाणेर, बालेवाडी, औंध भागात बंदला संमिश्र प्रतिसाद; मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाकडून लाक्षणिक उपोषण

पिंपरी-चिंचवड पोलिसांना अनेक गुन्ह्यात पुणे शहर पोलिसांच्या श्वान पथकाची मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी देखील अनेकदा निर्माण झाल्या होत्या. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात नवीन दोन श्वान दाखल झाल्याने अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना मोठी मदत होणार आहे.