पुणे : दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला येणार असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने विमानतळावर सापळा लावला. विमानतळावर महिला साथीदारासह उतरली. गडबडीत महिला आणि तिच्याबरोबर असलेला साथीदार विमानतळातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात होते. डीआरआयच्या पथकाने दोघांची संशयावरुन चौकशी सुरू केली. त्यांची तपासणी करण्यात आली. सहा किलो ९१२ सोन्याची भुकटी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. दोघांकडून सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली.

हेही वाचा…गुंड गजानन मारणे, पार्थ पवार भेटीवर अजित पवार म्हणाले, “अतिशय चुकीची…”

याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय सीमाशुल्क कायद्यान्वये (कस्टम ॲक्ट) गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांची न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. चार दिवसांपूर्वी कस्टमच्या पथकाने पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ७३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two dubai passengers arrested for smuggling gold at pune airport pune print news rbk 25 psg