पुणे : महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या भरोसा सेलने छापा टाकून उघडकीस आणला आहे. याप्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा सेंटरचे मालक सूरज भरत शाहू (रा. वाशी ठाणे) याला अटक केली आहे.

विश्रांतवाडीतील धानोरी जकात नाका परिसरात असलेल्या गुडविल स्क्वेअर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या भरोसा सेलला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर छापा टाकून, दोन पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी मालक असलेल्या शाहूला अटक केली आहे. अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक  संगीता जाधव यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

pune crime news
महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई निलंबित, विवाहास नकार देऊन पाच लाख, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Raid on massage parlour in Aundh crime registered in prostitution case
औंधमधील मसाज पार्लरवर छापा, वेश्याव्यवसाय प्रकरणी गुन्हा
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
pune fraud latest news in marathi
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची ३२ लाखांची फसवणूक
Prostitution under name of massage parlour in Kalyaninagar police arrest one
कल्याणीनगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून एकास अटक
bhandup police arrested accused who forced women into prostitution by luring money
महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा आरोपी अटकेत
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप

हेही वाचा >>>‘प्यूमा ब्रँड’चे बनावट साहित्य विकणाऱ्या दुकानावर छापा; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

मसाज सेंटर गुन्हे शाखेच्या रडारवर

शहरातील विविध भागांत काही स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांत बाणेर, विश्रांतवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाईवरून अधोरेखित झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी आता गुन्हे शाखेने मसाज सेंटरविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेकडून बेशिस्त, बेकायदा आणि नियमबाह्य मसाज सेंटरची माहिती संकलित करून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Story img Loader