पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवडच्या मोशी मध्ये झाडाच्या एकाच फांदीला दोन मित्रांनी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोसरी एम.आय डी.सी पोलीस अधिक तपास करत आहेत. शिकंदर शेख आणि तुषार अशोक ढगे अशी आत्महत्या केलेल्या मित्रांची नावं आहेत. आत्महत्येचं अद्याप कारण समजू शकलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीतील भारत माता चौका जवळ असलेल्या परिसरात सिकंदर आणि ढगे या दोन मित्रांनी एका झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पैकी, सिकंदर शेखचा विवाह झालेला आहे. दोन्ही मित्र बीड जिल्ह्यातील जामखेडमधून शुक्रवारी पिंपरी- चिंचवड शहरात आले होते. परंतु, आज सकाळी दहाच्या सुमारास दोघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
झाडाच्या एकाच फांदीला, एकाच दोरीने गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरून मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. परंतु, अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेलं नाही. घटनेचा तपास भोसरी एम.आय.डी.सी पोलीस करत आहेत.