राहुल खळदकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. ससून रूग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललितला चेन्नईत मुंबई पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने शनिवारपर्यंत (२१ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा-पुण्यात विश्वचषकातील भारत वि बांगलादेश सामना, वाचा १०० रुपयात गहुंजे स्टेडियमला कसे पोहचायचे…

ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललितने नाशिकमधील मैत्रिणींकडून २५ लाख रुपये घेतले होते. चेन्नईतून तो श्रीलंकेत पसार होण्याच्या तयारीत होता. गेले पंधरा दिवस पुणे पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी दिवसरात्र तपास करत होते. ललितने ससून ते चेन्नईपर्यंत प्रवास कसा केला. त्याला आश्रय कोणी दिला ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. ललितला त्याच्या मैत्रिणींनी पसार होण्यास मदत केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने दोघींना अटक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two friends of drug trafficker lalit patil arrested from nashik pune print news rbk 25 mrj