पुणे : शहरात कोयते उगारुन दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. शिवाजीनगर, हडपसर भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविल्याच्या घटना उघडकीस आल्या.

सतीश भीमा काळे (वय ४१, रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तुषार काकडे, मोन्या कुचेकर, दीपू शर्मा , दाद्या बगाडे (सर्व रा. हडपसर ) यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुंड दीपू शर्मा याला अटक करण्यात आली आहे.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

आरोपी आणि काळे ओळखीचे आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाला झाला होता. आरोपी मध्यरात्री काळेच्या घराजवळ  आले. काळे घरासमोर झोपला होता. आरोपी बगाडे याने काळे याच्यावर कोयत्याने वार केला. त्या वेळी काळेने मला का मारतो, अशी विचारणा केली. आरोपींनी त्याच्या डोक्यात वार केला. आरडाओरडा ऐकून काळेची पत्नी, मुलगा घरातून बाहेर आले. त्या वेळी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ करुन आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. तरडे तपास करत आहेत.

वरातीत नाचण्यावरुन कोयत्याने वार

हेही वाचा >>> पुणे : विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण

वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी सागर विलास सुकळे (वय २२, रा. काकडे वस्ती, कोंढवा) याच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरदीप भालचंद्र जाधव (वय १९, रा. शंकरमठ, हडपसर) याने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव आणि आरोपी ओळखीचे आहेत. गेल्या महिन्यात एका लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन जाधवचा आरोपींशी वाद झाला होता. हडपसरमधील गांधी चौकात आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार करुन दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करत आहेत.

हेही वाचा >>> तरुण असे का वागतात? पुण्यात कोयता गॅंगच्या कहराच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञांनी दिली ‘ही’ माहिती

वाद मिटवायला बोलावून चाकुने वार

वाद मिटविण्यासाठी तरूणाला बोलावून त्याच्यावर चाकुने वार केल्याची घटना स्वारगेट भागातील शंकरशेठ रस्त्यावर घडली. या प्रकरणी दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. रवी उर्फ संतोष सिद्धू पामाकोळ (वय २४), प्रथम उर्फ मनोज विनोद ससाणे (वय २१ दोघे रा. कासेवाडी भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या बरोबर असलेल्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. आशितोष यादव (वय ४० रा. कासेवाडी) असे जखमीचे नाव आहे. आरोपी रवी आणि प्रथम यांच्याशी आशितोषचा वाद झाला होता. वाद मिटवण्यासाठी आरोपींनी त्याला बोलावून घेतले. त्याच्यावर चाकुने वार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले तपास करत आहेत.