भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुळशीतील कोलाड रस्त्यावर हा अपघात झाला. सौरभ दत्तात्रय भोसले, कुणाल दिलीप भोसले (दोघे रा. वळणे, ता. मुळशी, जि. पुणे) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी जीपचालक स्वप्नील रमेश पळसकर (वय २९, रा. पळसे, ता. मुळशी, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-कोलाड रस्त्यावरुन मध्यरात्री भरधाव जीप पुण्याकडे जात होती. त्या वेळी जीपने दुचाकीस्वार सौरभ भोसले आणि सहप्रवासी कुणाल भोसले यांना माले गावाजवळ धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भोसले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

Story img Loader