पुणे : सासवड रस्त्यावरील दिवे घाटात टँकर उलटून दुचाकीला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अपघातात चौघे जण जखमी झाले. कच्च्या अल्कोहोलची वाहतूक करणारा दिवे घाटात उलटला. टँकरने दिवे घाटातून निघालेल्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. टँकर पलटल्यानंतर त्यात दोघे जण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेेतली. केबीनमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. अपघातात चौघे जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुणे : दिवे घाटात टँकर उलटून दोघांचा मृत्यू; चौघे जण जखमी
सासवड रस्त्यावरील दिवे घाटात टँकर उलटून दुचाकीला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अपघातात चौघे जण जखमी झाले.
Written by लोकसत्ता टीम
![Accident](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/Accident.jpg?w=1024)
First published on: 09-05-2023 at 00:37 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two killed tanker accident dive ghat four people were injured pune print news rbk 25 ysh