पुणे : सासवड रस्त्यावरील दिवे घाटात टँकर उलटून दुचाकीला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अपघातात चौघे जण जखमी झाले. कच्च्या अल्कोहोलची वाहतूक करणारा दिवे घाटात उलटला. टँकरने दिवे घाटातून निघालेल्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. टँकर पलटल्यानंतर त्यात दोघे जण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेेतली. केबीनमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. अपघातात चौघे जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा