लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कोंढवा परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला.
राजेश रमेश पवळे (वय २९, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. कोंढव्यातील खडीमशीन चौकातून येवलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकजण थांबला असून, त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलिसंच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दुचाकीस्वार पवळेला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे गांजा आढळून आला. त्याच्याकडील दुचाकीची तपासणी केली, तेव्हा डिक्कीत एक किलो ८९२ ग्रॅम गांजा सापडला.
आणखी वाचा-वेताळ टेकडीवर नशेबाज युवक- युवती; अभिनेते रमेश परदेशींकडून ध्वनिचित्रफीत प्रसारित
पवळे सराईत असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश पाटील आणि पथकाने ही कामगिरी केली.