खडकी बाजार परिसरातून दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी एका पानपट्टी चालकासह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ४०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाने (एमआय) तिघांना अटक केली.

हेही वाचा- आरोग्य प्रमुख, उप आरोग्य प्रमुख पद भरतीचा ठराव लपविला; महापालिका प्रशासनाचा प्रताप; दहा वर्षांपासून पदे रिक्त

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

अतुलकुमार नरेशकुमार मिश्रा (वय २३ रा. शेवाळे टाॅवर्स, खडकी बाजार), रवी उर्फ सूरज वीरेंद्र शुक्ला (वय ३५, रा. नवा बाजार, खडकी), राजूलकुमार उर्फ गुड्डू भाई राजबहाद्दुर सेन (वय ४६, रा. लेक व्ह्यू सिटी, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी अतुलकुमार मिश्रा याची खडकी बाजार परिसरात पानपट्टी आहे. आरोपी रवी शुक्ला अतुलचा ओळखीचा आहे. तो अतुल याच्या पानपट्टीत काम करत होता. शुक्ला याच्याकडे बनावट नोटा होत्या. दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा वितरित केल्यास ३० हजार रुपये मिळतील, असे रवीने अतुलला सांगितले होते. त्यानुसार अतुल दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन खडकी बाजार परिसरातून निघाला होता. एलफिस्टन रोडवर तो येणार असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर याबाबतची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला देण्यात आली.

हेही वाचा- VIDEO : “वाचवा रे!…बसचालक त्रास देतोय, मदत करा, उतरू देत नाही” असं म्हणत प्रवाशाने ठोकली बोंब

एलफिस्टन रोडवर सापळा लावून अतुलला पकडण्यात आले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ४०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आरोपी रवीला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने बनावट नोटा राजूलकुमारने दिल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. राजूलकुमारला ताब्यात घेण्यात आले. बनावट नोटा वितरित करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालायने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपासात राजूलकुमारने बनावट नोटा कोलकात्यातून आणल्याचे माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Story img Loader