पुणे : सराईत गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन वकिलांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे आहेत. दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात वकिली करतात. गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना मोहोळ खून प्रकरणातील अन्य आरोपींसोबत शुक्रवारी रात्री अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहोळ खून प्रकरणात आठ जणांना रात्री पुणे सातारा रस्त्यावरील शिरवळ परिसरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, मोटार जप्त करण्यात आली. मोहोळचा साथीदार साहिल उर्फ मोन्या पोळेकर याने जमीन खरेदी प्रकरणातील आर्थिक व्यवहारातून मोहोळ याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला.

हेही वाचा : कोण होता शरद मोहोळ? वाचा ‘हिंदू डॉन’ अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरदची रक्तरंजित कहाणी…

मोहोळचा शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात मोहोळचा पूर्वीचा साथीदार साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले. हल्लेखोरांनी पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री खेड शिवापूर परिसरातून मुख्य आरोपी साहिल पोळेकरसह आठ जणांना अटक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lawyers arrested in sharad mohol murder case kothrud pune print news rbk 25 pbs